मा.खा.अशोकजी नेते यांची सावली तालुक्यातील सिर्शी येथे सांत्वनपर भेट....

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : सावली तालुक्यातील सिर्शी येथील दादाजी पाटील किनेकर यांचा मुलगा स्वर्गीय बबलू दादाजी किनेकर व आई काही कामानिमित्ताने सावली येथे गेले असता त्यांचा रस्त्यांच्या वाटेत एका अज्ञात ट्रक वाहन चालकाने अपघात केला.या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या संबंधितची बातमी खा.अशोकजी नेते यांना माहिती दिली होती.पण बाहेर असल्याने येता आले नाहि.परंतु या संबधितची माहिती कळताच दिवाळीचा सण असून सुद्धा त्यांच्या सिर्सी येथे स्वघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच सांत्वन केलं
त्यावेळी खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, ता.महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,माजी बांध.सभापती संतोप तंगडपलीवार, माजी. पं.स. सदस्य गणपत कोठारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर वाकुडकर,भाजपाचे युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार, ग्रा.प.सदस्य राकेश गोलेपलीवार, किनेकर सर, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.