"जिल्हास्तरीय जलतरण चॅम्पियनशिप" स्पर्धेत चैतन्य चंद्रशेखर झाडे याने जलतरणात प्रथम क्रमांकाची तीन बक्षिसे जिंकली

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जाजू इंग्लिश मिडियम स्कूल व ॲमॅचर असोसिएशनच्या एकत्रित सहयोगाने "जिल्हास्तरीय जलतरण चॅम्पियनशिप" २४ सप्टेंबर २०२२ रोजी जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या मिनी ऑलिंपिक लेवल स्विमिंग पूल येथे घेण्यात आली. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सर्वच इंग्रजी, मराठी, हिंदी, सेमी इंग्रजी शाळेतील मुलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला.

या चॅम्पियनशिपचे उद्घाटन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे, पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप भुजबळ, बांधकाम विभाग सब डिव्हिजनल ऑफिसर माननीय प्रवीण कुलकर्णी आणि यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय नंदा खुरपडे मॅडम यांच्या शुभहस्ते पार पडले.

ही स्पर्धा पाच गटांत घेण्यात आली होती. यात गट इ ५० मीटर फ्री स्टाईल मुलांमधून चैतन्य झाडे (गोल्ड मेडल), गट इ २०० मीटर फ्री स्टाईल मुलांमधून चैतन्य झाडे (गोल्ड मेडल) गट इ २५ मीटर बटरफ्लाय स्ट्रोक मुलांमधून चैतन्य झाडे (गोल्ड मेडल) प्राप्त केले.

माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अनेक आशीर्वाद दिले. सोबतच विद्यार्थ्यांच्या शारिरीक, बौद्धिक व शैक्षणिक प्रगतीस अशाप्रकारचे उपक्रम नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत पात्र ठरेल. तसेच कोरोणाच्या कालानंतर प्रथमच शाळेने आपल्या जिल्ह्यात अशाप्रकारचा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले.

उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच उपप्राचार्य अश्विन जगताप, समन्वयक साबेरा बाटावाला यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक तसेच अभिनंदन करीत अनेक आशीर्वाद दिले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.