मारहाण प्रकरणी शिक्षा

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी जामणी : शिविगाळ प्रकरणी भूषण वाढई प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी झरी जामणी यांनी झरीजामणी तालुक्यातील आरोपी नामे मंगेश बाबाराव लसंते वय २७ वर्षे रा. खडकडोह यास अठरा महीन्याचे कालावधीसाठी सदवर्तनाच्या अटी व शर्तीवर परिविक्षाधीन ठेवणेबाबतची शिक्षा ०५ सप्टेंबर रोजी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, झरीजामणी तालुक्यातील फिर्यादी ही मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत राहते. फिर्यादी व आरोपी हे जुन्या घरगुती कारणावरून एकमेकासोबत बोलत नाही दि.०९ डिसेंबर २०१६ रोजी सांयकाळी ५.३० वाजता फिर्यादी ही दळणाचे चक्कीवरुन घरी परत येत असताना आरोपी पुतण्या हा फिर्यादीचे समोर येऊन माझे सोबत का बोलत नाही असे म्हटले असता तुझ्या सोबत का बोलायचे असे फिर्यादी बोलली. असता आरोपीने काही न बोलता हातात सोबत आणलेल्या छोट्या चाकुसारख्या शस्त्राने फिर्यादीचे मनगटावर व दंडावर मारुन जखमी केले फिर्यादी ओरडली असता आरोपीने जीवाने मारण्याची धमकी देवुन पळुन गेला. त्यानंतर फिर्यादी ही घरी जावुन घडलेली घटना पतीला सांगुन पतीसह जखमेवर उपचार करून पोलीस स्टेशन मुकुटबन ला रिपोर्ट दिला. या वरुन पोलीसांनी आरोपी विरूद्ध भादवीचे कलम ३२४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला. व सदर गुन्हाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल नेहारे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी, डॉक्टर व तपास अधिकारी यांचे सह दहा साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पवनजीतसींग कपुर व ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी नापोका संतोष मडावी व जमादार मारोती टोंगे यांनी काम पाहीले.