कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
घटना अशी की, मानकी येथील शेतकरी चरणदास पांडुरंग ठेंगणे (54) हे दुचाकी क्र एम एच 29 डब्ल्यू 5040 ने आज रविवार रोजी दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास घरून काही कामानिमित्त वणी कडे निघाले सोबत मुलाला वाटेत असलेल्या शेतात त्याला सोडून वणीकडे जात असताना अशातच त्यांच्या पाठीमागून येत असलेल्या भरधाव चार चाकी पिकअप वाहनाने चरणदास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चरणदास हे रस्त्यावर पडले असता त्याच पिकअप वाहनाने त्यांना चिरडले व त्याच्या मृत्यू झाला.
आवाजाच्या दिशेने आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला धडक देवून चरणदास ठेंगणे यांच्या मृत्युस कारणीभूत ठरणाऱ्या पसार पिकअप वाहनचालकाच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघातातील पिकअप वाहन विस्फोटक वाहतूक करणारी असल्याची माहिती आहे. या घटनेचा पोलीसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास वणी पोलीस करित आहे.