ख्वाजा मोहम्मद हयात मदरसा वणी येथे स्वातंत्र्यदिन उत्सवात साजरा


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वणी येथील ख्वाजा मोहम्मद हयात मदरसा मोमिनपुरा वणी येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिनी राष्र्टध्वज फडकवून साजरा करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक शूरविरांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या बलिदानाची आहूती दिली अशा शूरविराच्या देशभक्तीची जाज्वंल्य भावना कायमस्वरूपी देशवासीयांच्या मनात राहावी व त्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने "13 ते 15 ऑगस्ट" या कालावधीमध्ये देशभरात "घरोघरी तिरंगा" उपक्रम राबविण्यात येत आहे,या अनूषंगाने वणी येथील "ख्वाजा मोहम्मद हयात मदरसा" मोमिनपूरा येथे उत्सवात साजरा करण्यात आला,विशेष म्हणजे सकाळ पासून पावसाच्या सरी वर सरी सूरू असतांनासूध्दा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
सामाजिक कार्यकर्ते नईम अजिज, सादिकभाई, छोटे खान, मौलाना साहब, मो साजिद, अकबर अली, मो मतीन, अनसारभाई आणि मोमिनपूरा मधील नागरिकांनी उपस्थित राहून झेंडयाला सलामी दिली.