सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 75 वा अमृत महोत्सवी स्वतंत्रदिन पार पडला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री रमेश बोहरा साहेब तर सचिव भेदी साहेब,सहसचिव श्री अशोक सोनटक्के,लोकमान्य टिळक महाविद्यालय चे प्राचार्य श्री प्रसाद खानझोडे,एस पी एम महाविद्यालय चे प्राचार्य श्री प्रमोद क्षीरसागर तर उपप्राचार्य श्री रमेश तामगाडगे हजर होते.
उपाध्यक्ष श्री बोहरा साहेब तसेच मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक राष्ट्रगीत बँड च्या पथकावर पार पडले.संविधानाचे वाचन श्री घोडमारे सर यांनी केले तर एन सी सी पथकाचे नेतृत्व मडावी सर नी केले.
कार्यक्रमाच सूत्रसंचालन व शालेय प्रार्थना श्री किरण बुजोने यांनी सादर केली.यावेळी दोन्ही महाविद्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.