सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : विदर्भ पटवारी संघ चंद्रपूर जिल्हा शाखा पटवारी संघाच्या एका मुख्य पदावर प्रामाणिक व निस्वार्थी भावनेतुन काम करणारे तथा मूल तालुक्यातील कार्यरत साजातील शेतक-यांचा विश्वास संपादन करणारे पटवारी किरण तुकारामजी माेडकवार यांचे सह एकुण ३४ उमेदवार आज रविवारी हाेवू घातलेल्या श्री विठ्ठल व्यायाम शाळेच्या निवडणूकीत सदस्य पदांसाठी आपले नशिब अजमावुन पाहत आहे. या निवडणूकीत स्व.वस्ताद दादाभाऊ येरेवार व शरद टेकुलवार या दाेन गटाचे उमेदवार निवडणूकीत उभे असून या शिवाय नव अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उभे ठाकले आहे. दरम्यान, ही निवडणूक अत्यंत चुरशीची,अटीतटीची व रंगतदार हाेत असुन सर्वांचे लक्ष या निवडणूकीच्या निकालाकडे वेधले आहे.
सकाळी ८ वाजेपासून स्थानिक विठ्ठल मंदिर सभागृहात मतदानाला सुरुवात झाली असुन १३ सदस्य पदासाठी एकंदर ४९९ सभासद आपल्या मतदानाचा हक्क बजावित आहे. दरम्यान आज या प्रतिनिधीने मतदान केन्द्र परिसराला प्रत्यक्ष भेट दिली असता त्या वेळी पन्नास टक्क्याच्या वर मतदान झाल्याची चर्चा मतदार वर्गात सुरु हाेती. पटवारी माेडकवार हे स्व.दादाभाऊ येरेवार पॅनल कडुन निवडणूक लढवित आहे.
मतदानाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असुन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.सुरेश राजेराम मेश्राम हे काम बघत आहे. मतदान स्थळी व त्या परिसरात पाेलिस प्रशासनाच्या वतीने पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला आहे.