शशिकांत निमसटकर यांची महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड

सह्याद्री न्यूज | राजविलास किनाके 
यवतमाळ, (ता.३) : यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्या पैकी१३ तालुक्यातील तालुका अध्यक्षांनी व सचिव यांनी बहुमताचा पाठिंबा दिल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी मा.शशिकांत निमसटकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. मारेगाव तालुका अध्यक्ष सुरेश येरमे, वणी तालुका उपाध्यक्ष विकास चिडे, दारव्हा सचिव किरण मोरे बाभूळगाव तालुका अध्यक्ष आशिष आकडे, पुसद कोतवाल संघटना, आर्णी तालुका अध्यक्ष अमोल लोंढे ,नेर तालुका अध्यक्ष रमेश घुगे,
राळेगाव तालुका अध्यक्ष.पी.व्ही. सावरकर, दिग्रस तालुका उपाध्यक्ष श्रीमती शारदा गायमुखे, उमरखेड तालुका अध्यक्ष शेख कलीम शेख मदार, झरी तालुका अध्यक्ष षण्मुखानंद कांबळे, कळंब तालुका अध्यक्ष मनोज पवार, यवतमाळ तालुका अध्यक्ष पंकज जाधव यांनी पाठिंबा दिला असल्याने जिल्हा अध्यक्ष पदी शशिकांत निमसटकर यांची निवड अविरोध करण्यात आली आहे. यावेळी निमसटकर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, कोतवालांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.