सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (ता.४) : सासुसोबत झालेल्या भांडणामुळे कुठलीही पर्वा न करता क्रूर मातेने आपल्याला स्वतःच्या सहा महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण केली. ही घटना अंबाझरी हद्दीत घडली असून घटनेचा विडिओ सोशल मीडियावर वायरल झाली. मातेचे कौर्य बघून पोलिसांनी स्वतः मातेच्या पुढाकार घेऊन बाळाची सुटका केली.
एक माता आपल्या सहा महिन्याच्या बाळाला गालावर, पाठीवर बेदमपणे व बेदरकारपणे पलंगावर फेकून देतानाची चित्रफीत समाजमाध्यमावर वायरल झाली. ही चित्रफीत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची चर्चा पसरताच पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी शहानिशा केली असता, पांढराबोडी परिसरातील ही महिला असल्याचे कळले. पोलिसांनी रात्रीच बाळाचा ताबा घेऊन त्याच्या वडिलांना बोलावून घेतले होते. त्यावेळी कौटुंबिक कलहातून सासूशी या महिलेचा २४ मे रोजी वाद झाला होता. या वादाचा राग तीने बाळावर काढला. रात्र झाल्याने पोलिसांनी बाळाची आरोग्य तपासणी करून घेतली व ताबा नातेवाईकांकडे दिला. तसेच सोमवारी जिल्हा बार संरक्षण अधिकारी, चाईल्ड लाईन यांच्याशी चर्चा करून संरक्षण व अधिकार कायद्याचे कलम ७५ आणि ३३२ कलमान्वये मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी महिला मनोरुग्ण असावी असा संशय पोलिसांना असून त्यांदृष्टीने तीचे समुपदेशन करण्याचा विचार व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलीसांनी मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.