टॉप बातम्या

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पत्रकार परिषद; आंदोलनाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये शेतरस्ता प्रकरणांमध्ये कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. बदकी भवन येथे आयोजित या परिषदेत शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

पत्रकार परिषदेत बोलताना, शेतरस्ता देण्याच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर बाबी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी व संबंधित कागदपत्रांची योग्य तपासणी न करता आर्थिक व्यवहारांच्या आधारे निर्णय दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत असून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून “चिरीमिरी” घेतली जात असल्याचाही दावा करण्यात आला.

यावेळी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारेगाव तहसील कार्यालयातील गेल्या दोन वर्षांतील शेतरस्ता प्रकरणांची चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. 

प्रकरणाची दखल न घेतल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी यासंदर्भातील प्रेस नोट प्रसिद्ध केली.यावेळी प्रशांत नांदे ता.सरचिटणीस, किसानचे ता.अध्यक्ष पवन ढवस, नगरसेवक राहुल राठोड, अनिकेत चोपने, गणेश खुसपुरे, पांडू उंबरकर, व अन्यायग्रस्त विनोद राजूरकर (बोरी ग.) यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान, या आरोपांबाबत तहसील प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();