टॉप बातम्या

ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मजरा रोडवर रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

अभय बंडुजी येरमे (वय अंदाजे 23, रा. मार्डी) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो ट्रॅक्टर चालक असून शेतातील काम आटोपून घरी परत येत असताना मार्डी जवळील वीज केंद्राजवळ त्याचा ट्रॅक्टर वाहन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. वृत्त लिहेपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल होण्याची प्रतीक्षा सुरू होती. मृतकाच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार असून बहिणीचे लग्न जुळले असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();