सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी तालुक्यातील नांदेपेरा मार्गांवरील पोहणा गावाच्या मुख्य पॉईंट वर सोमवारी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात नांदेपेरा येथील डॉ. अवताडे (वय अंदाजे ६५) जखमी झाले. ते स्टॉप वर ऑटोरिक्षातून उतरत असताना वणीकडून येणाऱ्या दुचाकी क्र (एम एच 29-सी एफ-4611) ने त्यांना मागून धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवर तीन जण प्रवास करत होते आणि ते हिवरी पोडी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्ताला तातडीने पुढील उपचारासाठी वणीच्या दिशेने रवाना करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी गावातील नागरिकांची तोबा गर्दी जमली होती.