सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अनुसूचित जाती (SC) वर्गीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्ष ते खाली मुंबई येथे 30 जून रोजी सकाळी 11 वाजता मेट्रो सिनेमा ते विधानभवनावर आयोजित भव्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी वणी येथून शेकडो कार्यकर्ते व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या उत्साहात समाज बांधव रवाना झाले आहे. "चलो मुंबई...! चलो मुंबई...!" या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी जिल्हा यवतमाळ, संत रविदास महाराज चर्मकार समाज सुधार मंडळ, वणी तसेच संत रविदास प्रबोधन केंद्र, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चाची सुरुवात झाली असून मोठया संख्येने समाज बांधव व कार्यकर्ते वणी येथून मा. संबाजी वाघमारे (विदर्भ प्रमुख, मराठवाडा संपर्क प्रमुख) यांच्या नेतृत्वात मुंबईकडे रवाना झाले आहे.
समाजाच्या हक्कासाठी एकजूट दाखविणे, आपल्या मागण्यांना बळ देणे आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका मांडणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्वांनी आपली नावे नोंदवून संघटित शक्तीचे दर्शन घडवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.