टॉप बातम्या

बोटोणीत अवैध धंद्यांविरोधात महिलांचा एल्गार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावबोटोणी येथे अवैध दारू व वरली मटका व्यवसायाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. महिलांनी ‘गांधीगिरी’चा मार्ग स्वीकारत प्रतीकात्मक दारूचे दुकान उघडून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. कोरोना काळापासून गावात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यासंदर्भात वारंवार लेखी निवेदने देऊनही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. आंदोलनादरम्यान काही ग्रामस्थांनी संबंधितांच्या घरासमोर जाऊन इशारा दिल्याने गावातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान, परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी व गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();