टॉप बातम्या

वैभव पवार यांची भाजप तालुका युवा मोर्चा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मारेगावच्या वतीने युवा नेतृत्वाला बळ देत महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. वैभव सुभाष पवार (नगरसेवक) यांची भाजपा तालुका युवा मोर्चा कार्यकारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय विश्रामगृह, मारेगाव येथे दिनांक १ मार्च २०२६ रोजी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व युवा कार्यकर्त्यांना एकत्रित करून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रम राबविण्याची जबाबदारी वैभव पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी नियुक्ती जाहीर करताना वैभव पवार यांनी पक्षाच्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून युवा मोर्चा अधिक सक्षम करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या नियुक्तीमुळे मारेगाव तालुक्यात भाजपच्या युवा संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.यावेळी अनिकेत चोपणे, अल्पसंख्यांक ता. अध्यक्ष इफ्तिखार शेख, भाजपचे डोमाजी भादीकर, मारोती राजुरकर,गजानन बदकी,महेश भसारकर, पंकज सालुरकर, पीयूष रांगनकर,रोहित ऊरवते,विकास मोहॄले तसेच सर्व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();