टॉप बातम्या

'डॉक्टर'डे वृक्षारोपणाने साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : डॉक्टर म्हणजे रुग्णांसाठी देवदूतच. एखाद्या व्यक्तीला आजारपण किंवा दुखापत झाल्यास डॉक्टर आपल्या ज्ञान, अनुभव आणि अथक प्रयत्नांच्या बळावर रुग्णाला नवजीवन देण्याचे कार्य करतात. अशा सर्व वैद्यकीय सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सागरझेप बहुद्देशीय संस्था, वणी (जि. यवतमाळ) यांच्या वतीने 'डॉक्टर डे' निमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशन, वणीचे अध्यक्ष डॉ. संकेत अलोणे तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डॉक्टरांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वणी परिसरात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून वृक्षतोड, कोळसा खाणींमुळे वाढणारे तापमान आणि घटणारी भूजलपातळी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करावा. वणी परिसर हिरवागार करण्यासाठी आम्ही डॉक्टरही सक्रियपणे योगदान देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सागर मुने, दिनेश अँड्रसकर, परम अँड्रसकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();