सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड, वणी येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांच्या सर्वांगीण आरोग्याची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. किरणताई देरकर (अध्यक्ष, सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशन) यांच्या हस्ते होणार असून, संस्थापिका एकविरा पतसंस्था, मारेगाव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संचिता विजय नगराळे (M.B.B.S., M.D., गोल्ड मेडलिस्ट, KEM मुंबई) या महिलांची तपासणी करून विशेषतः ‘गर्भाशय कॅन्सर’ संदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.
याशिवाय आयुर्वेदाचार्य सौ. सुवर्णा चरपे (BAMS, Dy.AC, पुणे) या नाडी परीक्षण व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार असून “अंगावर पांढरे जाणे… गंभीर समस्या” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र होणार आहे. गर्भाशय कॅन्सर तपासणी (पॅप स्मिअर टेस्ट) कॅम्पमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार असून तपासणीची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी राहील.
महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी संबंधित क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन