सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
महागाव : सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे तंटामुक्ती अध्यक्ष पंढरी देविदासराव लांबट यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा समाजोपयोगी उपक्रम राबवत महागाव येथील बजरंगबली देवस्थान कमिटीला खुर्च्यांचे दान केले. वाढदिवस साजरा करताना केवळ औपचारिकता न ठेवता समाजासाठी काहीतरी देण्याचा संदेश त्यांनी या कृतीतून दिला.
देवस्थान परिसरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खुर्च्यांचे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी या खुर्च्यांचा उपयोग होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
समाजकारणात सातत्याने सक्रिय असलेल्या पंढरी लांबट यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा त्यांनी जपल्याने त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.