टॉप बातम्या

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चार ब्रास वाळूसह टिप्पर जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : अवैध वाळू वाहतुकीविरोधात मारेगाव पोलिसांनी पहाटेच्या गस्ती दरम्यान धडाकेबाज कारवाई करत चार ब्रास वाळूने भरलेला टिप्पर जप्त केला. ही कारवाई १० फेब्रुवारी रोजी कुंभा ते करनवाडी मार्गावरील साखरा परिसरात करण्यात आली.

मारेगाव पोलिस स्टेशनचे पथक नियमित गस्त घालत असताना संशयित वाहन आढळून आले. पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिंगांबर किनाके, पोलीस कॉन्स्टेबल शुभम उईक व पोलीस शिपाई सागर दिपेवार यांनी वाहनाची तपासणी केली असता संबंधित टिप्परमधून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.

तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सुमारे ६ लाख रुपये किंमतीचा टिप्पर आणि अंदाजे २० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित चालकास ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();