सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक साप्ताहिक मुक्त ललकार कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत विद्यमान कार्यकारिणीने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यकारिणीचे कामकाज समाधानकारक व सुरळीत सुरू असल्याबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सर्वानुमते विद्यमान कार्यकारिणीचीच फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदी दिपक छाजेड, उपाध्यक्षपदी शेख इक्बाल तसेच सचिवपदी परशुराम पोटे यांची फेरनिवड करण्यात आली.
याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन संघटनेला अधिक सक्षम व सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत संघटितपणे कार्य सुरू राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस माजी अध्यक्ष आसिफ शेख, महादेव दोडके, विशाल ठोंबरे, प्रविण शर्मा, दिपक छाजेड, परशुराम पोटे, शेख इक्बाल यांच्यासह असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते. नव्याने फेरनिवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

