टॉप बातम्या

महावितरणची धाड: २.६५ लाखांचा दंड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : येथील ‘श्री शिवाजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ येथे महावितरणच्या पथकाने १० फेब्रुवारी रोजी अचानक धाड टाकून कथित वीज वापरातील अनियमितता उघड केल्याचा दावा केला आहे. तपासणीनंतर संबंधित वीज मीटर जप्त करण्यात आला असून संस्थेचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे. या प्रकरणी २ लाख ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

तपासणीदरम्यान एका खोलीत बसवलेल्या बटणाद्वारे मीटरचा पुरवठा बंद-चालू करता येत असल्याचा संशयास्पद प्रकार आढळल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बटण बंद केल्यावर मीटर थांबत व चालू केल्यावर पुन्हा सुरू होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापर आणि मीटर रीडिंगमध्ये तफावत निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार संस्थेचे दरमहा १० ते १५ हजार रुपये वीज बिल अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७०० ते १००० रुपयांपर्यंतच बिल येत असल्याची बाब समोर आली. या तफावतीच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पुढील तांत्रिक तपासणी व कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शिक्षणसंस्थेवर कारवाई झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास अतिरिक्त दंड किंवा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता महावितरणकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();