सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कथित मनमानी कारभार व शेतकऱ्यांवर होत असलेल्या पिळवणुकीच्या निषेधार्थ १६ फेब्रुवारीपासून संबंधित कार्यालयासमोर उघड्यावर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत दि. १३/०२/२०२६ रोजी लेखी पत्र देण्यात आले.
शेतकऱ्यांवर होणारी पिळवणूक तात्काळ थांबवावी, शेतकऱ्यांशी उध्दट वर्तन करणारे अधिकारी श्री जाधव यांच्यावर कारवाई करून बडतर्फ करावे, तसेच कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. ऑनलाईन जाहीर झालेली तारीख रद्द करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्याला कोणी दिला, असा सवालही उपोषणास हत्यार उपसणारे दिवाकर सातपुते यांनी विनंती अर्जात केला आहे.
दि. १९/०१/२०२६ रोजी दिलेल्या पत्राचा अहवाल सादर करावा, अन्यथा पुढील परिणामांना संबंधित विभाग स्वतः जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासन तातडीने दखल घेतील का याकडे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.