टॉप बातम्या

मारेगावात भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानीविरोधात आजपासून बेमुदत उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कथित मनमानी कारभार व शेतकऱ्यांवर होत असलेल्या पिळवणुकीच्या निषेधार्थ आज, दि. १६ फेब्रुवारीपासून संबंधित कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता उघड्यावर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे. 

याबाबत दि. १३/०२/२०२६ रोजी शेतकरी तथा उबाठा तालुका सचिव दिवाकर नामदेवराव सातपुते यांनी लेखी निवेदन प्रशासनाला दिले आहे.

शेतकऱ्यांवर होणारी पिळवणूक तात्काळ थांबवावी, शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करणारे अधिकारी श्री. जाधव यांच्यावर कठोर कारवाई करून बडतर्फ करावे, तसेच कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रशासन याची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेईल का, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();