टॉप बातम्या

कपडे धुण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील मौजा साखरा येथे कपडे धुण्याच्या पाण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, याप्रकरणी Maregaon Police Station येथे चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी देवानंद सिताराम बिलबीले (वय 48, रा. साखरा ता. मोरंगाव जि. यवतमाळ) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातील महिला कपडे धुत असताना ते पाणी रस्त्याने शेजारी राहणाऱ्या पांडुरंग अंबादास देवाळकर यांच्या घराकडे गेले. यावरून पांडुरंग देवाळकर (वय 55), त्यांची पत्नी वंदना देवाळकर (वय 45), मुलगा प्रज्वल देवाळकर (वय 25) व मुलगी साक्षी देवाळकर (वय 21) यांनी फिर्यादीच्या घरी येऊन वाद घालत शिवीगाळ केली. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस पांडुरंग व प्रज्वल यांनी कुर्‍हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच फिर्यादीचे चुलत भाऊ धनश्याम यांना कुर्‍हाडीच्या लोखंडी पात्याने मारहाण करून जखमी केल्याने रक्तस्राव झाल्याचे सांगितले आहे. मोठे भाऊ तुळशिराम बिलबीले यांनाही काठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनास्थळी उपस्थित शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविला. मात्र आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीच्या जबानी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्रावरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2), 351(3), 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();