सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भूमी अभिलेख कार्यालयाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला. वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या पुढाराकाराने बेमुदत उपोषणाची दखल घेत समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे बुधवार दिवस निश्चित केला आहे.
भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात उघड्यावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.शेतकरी दिवाकर सातपुते यांनी हे उपोषणाचे हत्यार उपासले होतं. या उपोषण दरम्यान वणी उपविभागीय क्षेत्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी उपोषस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला. हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी जयघोष देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदार संजय देरकर, जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुटे,शिवसेनेचे सुधीर थेरे, तहसीलदार उत्तम निलावाड, बिडीओ भीमराव व्हनखंडे, भूमिअभिलेखचे सहाय्यक एस आर गुल्हाने हे उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणावर (ता.18) निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ह्या उपोषणास तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची उपोषणकर्ते दिवाकर सातपुते यांनी मान्य केले आहे. बुधवारी मारेगाव तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा आढावा घेऊन निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांच्या ज्यांच्या समस्या, प्रश्न, प्रलंबित प्रकरणे असतील त्यांनी बुधवारला प्रत्यक्ष उपस्थित राहावे असेही आमदार यांचेकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलेले हे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले असून शेतकऱ्यांच्या समस्यावर जर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर त्याचक्षणी पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे, असे शेतकरी दिवाकर सातपुते म्हणाले.