टॉप बातम्या

मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या वणी येथून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच वैद्यकीय कारणांसाठी छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबाद येथे प्रवास करतात. मात्र वणीहून या दोन्ही शहरांकडे थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना वारंवार बदल करीत प्रवास करावा लागतो, परिणामी वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वणी–छत्रपती संभाजीनगर तसेच वणी–हैदराबाद अशी थेट बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने मानवी हक्क सुरक्षा परिषद यांनी केली आहे. दि. १७ फेब्रुवारी रोजी वणी आगारप्रमुख विवेक बन्सोड यांना सविस्तर निवेदन देऊन ही मागणी मांडण्यात आली.

निवेदन देताना परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख परशुराम पोटे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ. सुमित्रा नारायण गोडे, वणी विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी, सौ. मनिष सुरेंद्र निब्रड (यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा), संजय चिंचोलकर, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुरेश बन्सोड, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने यांच्यासह परिषदेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सदर बससेवा तातडीने सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी व वणी शहरास थेट संपर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();