टॉप बातम्या

वणीत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, यवतमाळ जिल्हा शाखा वणी यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व समाज मेळावा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा शनिवारी (२१ फेब्रुवारी) वणी येथील शेतकरी मंदिरात होणार आहे. या मेळाव्यात विवाहोच्छुक युवक-युवतींसाठी स्नेहबंध परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा समाज गौरव व समाज भूषण पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील
पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतील समाजबांधव, आमदार, खासदार व मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

विशेष अतिथी म्हणून भिलाई (वैशाली नगर) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रितेश सैनी यांची उपस्थिती लाभणार आहे. या समाज मेळाव्यास नाभिक समाजातील सर्व बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत नक्षिने यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();