टॉप बातम्या

वनोजा देवी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : वनोजा देवी येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला जानामाय कायामाव क्रीडा मंडळ, वनोजा यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली असून गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी भजन गायन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर तसेच शिवचरित्रावर प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. रामधुनच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण वनोजावासी एकत्र जमले होते. परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांना ग्रामगिता, प्रसस्ती पत्र, तसेच प्रार्थनापुस्तकांचे वितरण करण्यात आले.सायंकाळी सप्त खंजरी वादक ह.भ.प. उदयपाल महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यांच्या ओजस्वी वाणी व खंजरीच्या तालावर सादर केलेल्या कीर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि वातावरण भक्तिमय झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांडुरंगजी देवाळकर यांनी भूषविले. बाळा बरडे यांनी मार्गदर्शन केले. मोहन हेवाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर भारकर धांडे यांनी आभार प्रदर्शन केले. विठ्ठल पिदुरकर, टिनू डवरे (उपाध्यक्ष), अंकित लखमापूरे, शंकर टोंगे, प्रशांतकुमार भंडारी (उपसरपंच), गोहोकर सर सतीश मिलमिले,पंढरी धांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();