टॉप बातम्या

वरोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा यांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. चंद्रकांत कुंभारे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. कुंभारे यांनी छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीतील सर्वसामान्य मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची उभारणी कशी केली, याचे प्रेरणादायी उदाहरण उपस्थितांसमोर मांडले. तसेच शिवरायांच्या स्वराज्याच्या आदर्शाचा विचार डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना कशी घडविली, यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद तांबेकर, उपाध्यक्ष अशोक देवगडे, कोषाध्यक्ष मधुकर बंड, सहसचिव ॲड. रोशन नकबे, प्रा. चरणदास लिहीतकर, सीमाताई वनकर, प्रीतम सोनारकर, आनंदराव जांभूळकर, रमेश टिपले, विनोद बिरया, दशरथ शेंडे, नारायण पोथारे, चिंतामण आत्राम, परशुराम फुलझेले, मनोज वनकर, प्रकाश टिपले, बाळू गेडाम, सतीश गेडाम, प्रेम मुंजनकर, यशवंत सायरे, ॲड. अरविंद पेटकर, हरीभाऊ दारुंडे, गुलाब बागेसर, प्रकाश गायकवाड, सुरेश मेश्राम, प्रतिभाताई कुंभारे, सरलाताई ठमके, अलकाताई पचारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. रोशन नकबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद तांबेकर यांनी केले. कार्यक्रम शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();