टॉप बातम्या

प्रशासनाकडून रेती वाटपाचा शुभारंभ; घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वितरण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दर्जेदार व मोफत रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीला अखेर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत रेती वाटपाचा शुभारंभ केला. पंचायत समिती व महसूल विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून दांडगाव व कोसारा घाट येथे आज रेती वितरण कार्यक्रम पार पडला.
कुंभा-बोटोणी परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना कोसारा घाट येथून, तर मार्डी-वेगाव परिसरातील लाभार्थ्यांना दांडगाव घाट येथून रेती देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आज काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रेती वाटप करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून रेती घाट सुरू करून घरकुल बांधकामासाठी दर्जेदार रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने होत होती. यामध्ये काँग्रेस, उद्धव सेना, मनसे तसेच भाजप पक्षानेही पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत प्रशासनाने बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आणि रेती वाटपाचा मुहूर्त साधला.
यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, विस्तार अधिकारी जाधव, भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, उद्धव सेना तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, मनसे अध्यक्ष रुपेश ढोके, प्रसाद ढवस, अमोल कुमरे, शरद ताजणे, पवन ढवस पत्रकार माणिकराव कांबळे तसेच मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हा घाट सुरू करण्यामागील उद्देश घरकुल लाभार्थ्यांनाच प्राधान्याने रेती मिळावी हा आहे,” असे प्रतिपादन तहसीलदार उत्तम निलावाड यांनी यावेळी केले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे घरकुल बांधकामांना गती मिळणार असून लाभार्थ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();