टॉप बातम्या

घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळण्याबाबत मागणीला यश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वेळेत व दर्जेदार रेती उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः रेतीपुरवठ्यासाठी दांडगाव घाट प्रामुख्याने सुरू करावा, ही प्रमुख मागणी होती. अखेर या मागणीला यश आले असून प्रशासनाने दांडगाव घाट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना अविनाश लांबट, अध्यक्ष: भारतीय जनता पार्टी तालुका मारेगाव यांनी शासन व प्रशासनाचे आभार मानले.

“आम्ही तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळावी, दर्जेदार रेती मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो. दांडगाव घाट सुरू करण्याची आमची मागणी मान्य झाल्याने अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. शासन व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद,” असे त्यांनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे घरकुलांची रखडलेली बांधकामे वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();