सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यात भाजप पक्षाची ताकद सातत्याने वाढताना दिसत आहे. मच्छिन्द्रा येथील जेष्ठ कार्यकर्ते मधुकरराव कुळसंगे यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी नत्थू गेडाम (ग्रामपंचायत सदस्य), संजय देवतळे, उमेश क्षीरसागर, अविनाश किनाके, गणेश परचाके आणि गौरव उईके यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
हा पक्षप्रवेश सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट आणि तालुका सचिव अमोल कुमरे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.