सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : रेती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाबाबत प्रशासनाने दांडगाव-कोसारा येथून सुरुवात केली असली तरी प्रत्यक्ष घाटावर वाटपादरम्यान कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात (उबाठा) शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी महसूल विभागामार्फत मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन सादर करून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
घाटावर नियुक्त कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने लाभार्थ्यांची हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. घरकुल धारकांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने मोफत रेती मिळावी तसेच कोणतीही पिळवणूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, देवा बोबडे, बद्रूद्दीन काजी, विशाल झाडे, सौ. डिमन टोंगे, गंगाधर कडुकर, संभा बहिरे, चंद्रशेखर थेरे, अजय रायपुरे, नीलकंठ बहिरे तसेच शहर प्रमुख अभय चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.