सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय हरिभाऊ दारुडे यांनी केले. त्यांनी कार्यक्रम करण्यामागे महापुरुषांच्या त्यागाची जाणीव ठेवून नवीन पिढीला मार्ग दाखविणे यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांच्या पत्नीचे योगदान असते असे त्यांनी सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्यमान गोंडाने साहेब व गोंडाने मॅडम यांनी रमाची रमाई कशी झाली,हे अनेक उदाहरण देऊन पटवून दिले.
विहाराचे अध्यक्ष विजय मेश्राम यांनी त्यांच्या त्यागाचा गुणगौरव केला. शेवटी अध्यक्ष माननीय दुर्योधन यांनी रमाई व आजच्या स्त्री यावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमती वैशाली पेटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुष्यमती न लू दारुंडे यांनी मानले.