सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राच्या वतीने दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर आधारित भावस्पर्शी गीतगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात डॉ. संचिता नगराळे, शर्वरी बाविस्कर, अरुण डवरे सर, मीनाक्षी चिकाटे, सौ. डवरे तसेच इतर कलाकारांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारी गीते सादर केली. गीतगायनातून माता रमाई यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा प्रभावी संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राचे संचालक खंडारे सर यांनी केले. कार्यक्रमास संगीतप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रम भक्तीभाव व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

