टॉप बातम्या

कर्जमाफी प्रक्रियेस विलंब ; कागदपत्रे सादर करण्याचे पुन्हा पिागाव सोसायटीचे आवाहन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावशासनाच्या प्रस्तावित कर्ज निवारण (कर्जमाफी) योजनेच्या अनुषंगाने राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. याअंतर्गत प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर विहित नमुना प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ मध्ये माहिती तयार केली जात आहे.

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, पिसगाव (रजि. नं. २०६२) अंतर्गत थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलनाचे काम सुरू असून, वारंवार विनंती करूनही अनेक सभासदांनी अद्याप आपली आधार कार्ड, फार्मर आयडी व आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. परिणामी अपूर्ण माहितीमुळे कर्जमाफी प्रक्रियेस विलंब होत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सद्यस्थितीत संस्थेकडून २७२ थकीत सभासदांचा डेटा शासनाकडे पाठविण्यात आला असून, उर्वरित सभासदांची माहिती कागदपत्रांअभावी प्रलंबित आहे. आवश्यक कागदपत्रे वेळेत प्राप्त न झाल्यास संबंधित सभासद कर्ज निवारण योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेला दिलेली नाही, अशा सर्व शेतकरी सभासदांनी त्वरीत संबंधित संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();