सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : चोपन येथे सुरू असलेला पाण्याचा आरो हा मागील तीन ते चार महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. बंद असलेला हा आरो दि. 18 फेब्रुवारी पर्यंत सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा चोपन येथील युवकांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस स्टेशन मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
चोपण येथे दोन वेगवेगळ्या योजनेमधून पाण्याचे आरो बसविण्यात आले होते. परंतु हे आरो मागील चार महिन्यापासून बंद आहे. येथील आरोचे बिल हे तीन लाखाच्या वर थकीत असल्याने वीज मंडळाकडून या आरोची वीज कट करण्यात आली होती. तेव्हापासून हे आरो बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मार्डीवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
येथील नागरिकांची होणारी पाण्यासाठी हेळसांड त्वरित थांबवण्यात यावी आणि 18 फेब्रुवारी पर्यंत आरो सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा गटविकास अधिकारी मारेगाव, तहसीलदार,तहसील कार्यालय मारेगाव तसेच पोलीस स्टेशन मारेगाव यांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे. यावेळी नितीन आसुटकर,गणेश रासेकर, संदीप देऊळकर, महेश जोगी, मनोज चिंचोलकर,प्रणय आसुटकर उपस्थित होते.तसेच निवेदनावर अनेक नागरिच्यासह्या आहेत.