देवाळा येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : छत्रपती शिव प्रतिष्ठान तसेच समस्त देवाळा ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात भगवे झेंडे, पारंपरिक भजन आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी परिसर स्वच्छता मोहिमेने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जागनाथ बाबा गुरुदेव सेवा भजन मंडळ, पांढरकवडा यांच्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले. सकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत ज्ञानेश्वर माऊली वारकरी बाल भजन मंडळ, कोसरा (जि. चंद्रपूर), गावातील पुरुष व महिला भजन मंडळे तसेच जि.प. शाळा देवाळा यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीत शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले.
दुपारी आयोजित व्याख्यानात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते श्री. संदीप गोहोकार (वणी) यांनी शिवचरित्र व राष्ट्रनिर्मितीतील शिवरायांचे योगदान यावर प्रभावी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अविनाशभाऊ लांबट (सरपंच संघटना अध्यक्ष, मारेगाव तालुका), सरपंचा रुखमाबाई माणिकराव कोयचाडे, उपसरपंच सुरेश लांडे, पत्रकार अमोल कुमरे, राजू बोढाले, अभिजित भोयर, उपस्थित होते. 
व्याख्यानानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच श्री. सुरेशभाऊ लांडे (उपसरपंच) यांच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली वारकरी बाल भजन मंडळास ₹११,१०१ रुपयांचे योगदान देण्यात आले. छत्रपती शिव प्रतिष्ठान मंडळ व समस्त देवाळा ग्रामवासी यांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();