सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होत असताना मारेगाव तालुक्यातील रामेश्वर येथेही शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून भव्य दिंडी काढण्यात आली.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी मिरवणुकीत उत्साहाने भाग घेतला. ठिकठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर आयोजित कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटपाने करण्यात आली.
या उत्सवात गावातील तरुण, बालगोपाल तसेच महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिवजयंती उत्साहात साजरी केली.