टॉप बातम्या

सहा वर्षांच्या फातिमा शेखचा रमजानचा पहिला रोजा; शांती आणि एकतेसाठी प्रार्थना


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : प्रभाग क्रमांक १० येथील फातिमा इफ्तेकार शेख (वय ६ वर्षे) हिने रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा अत्यंत श्रद्धा, धैर्य आणि विश्वासाने पूर्ण केला. रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवून संयम, त्याग आणि आत्मशुद्धीचा संदेश देतात.

लहान वय असूनही फातिमाने तब्बल तेरा तास काहीही न खाता-पिता कडक उन्हात रोजा पाळत आपली जिद्द आणि श्रद्धा दाखवून दिली. तिच्या या कृतीमुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फातिमाने आपल्या रोज्यानिमित्त समाजात एकोपा निर्माण व्हावा तसेच देशात कायम शांततेचे वातावरण राहावे यासाठी प्रार्थना केली. तिच्या या निरागस आणि प्रेरणादायी कृतीतून “हौसला बुलंद हो तो उम्र मायने नहीं रखती” हेच अधोरेखित झाले आहे.

लहान वयात दाखवलेली ही श्रद्धा आणि चिकाटी इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();