टॉप बातम्या

अभियांत्रिकी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : येथील २२ वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने रविवारी दुपारी सुमारास घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. संकेत शशिकांत कोरले असे मृत युवकाचे नाव आहे.

संकेतचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले होते. आई शेतीकाम करते, तर बहीण उमरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. संकेत यवतमाळ येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता आणि काही महिन्यांपासून मारेगाव येथे राहत होता.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();