टॉप बातम्या

मारेगावच्या मानात तुरा : अविनाश लांबट यांना “अचिवर अवॉर्ड 2026”


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अभिरुचि फाउंडेशन नागपूर तर्फे आयोजित “अचिवर अवॉर्ड 2026” हा भव्य सोहळा नागपूर येथील सेंट्रो मॉल येथे रविवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. 

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना या मंचावर सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनतर्फे समाजातील प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देत अशा उपक्रमांद्वारे सकारात्मक बदल घडविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो.

या सोहळ्यात मारेगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष श्री अविनाश लांबट यांना त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “अचिवर अवॉर्ड 2026” प्रदान करून गौरविण्यात आले.

श्री लांबट यांनी तालुक्यात विविध विकासकामे, जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्याची धडपड आणि युवकांना संघटनात्मक पातळीवर सक्षम करण्यासाठी घेतलेली पुढाकार यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, वीज, पाणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे मारेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

श्री अविनाश लांबट यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील उपसरपंच सुरेश लांडे, प्रशांत नांदे, बाळू चौधरी, अमोल कुमरे, प्रवीण बोथले, पवन ढवस, सचिन येरगुडे यांचेकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();