सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथे संत गाडगे बाबा यांची जयंती भक्तिभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छता, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजात स्वच्छता आणि बंधुतेची भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी श्री. प्रशांत नांदे, श्री. गजानन मुके, श्री. बाबाराव चिंचूलकर, श्री. किशोर चिंचुलकर, श्री. आशीष चिंचूलकर यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.