टॉप बातम्या

घुग्गुस पोलिसांचा वेगवान तपास! अवघ्या दोन तासांत मोबाईल चोर गजाआड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

घुग्गुस : शहरातील केबी खान कॉम्प्लेक्स समोरून घरी जात असताना एका महिलेचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने हिसकावून पळ काढला. या घटनेची तक्रार महिलेने तत्काळ घुग्गुस पोलीस ठाण्यात दिली.

तक्रार मिळताच पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू करून अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध लावला. पोलिसांनी २१ वर्षीय चंदन कुमार सहानी (रा. बिहार, सध्या मुक्काम घुग्गुस) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सपोनि सचिन तायवाडे, सपोनि प्रफुल डाहुले, पोउपनि गणेश अनभुले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, अनिल बैठा, नितीन मराठे, प्रसनजीत डोर्लीकर, रवि वाभीटकर, महेश भोयर, विजय ढपकास व पवन डाखरे यांनी केली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();