टॉप बातम्या

राळेगाव येथे आदिवासींचा एल्गार, आरक्षण बचाव मोर्चा तहसीलवर धडकला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राळेगाव : बंजारा समाजाकडून अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करून आदिवासी समाजाचे घटनात्मक आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात तीव्र नाराजी पसरली असून या विरोधात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती राळेगाव व यवतमाळ च्या नेतृत्वाखाली आज दि 8 ऑक्टोंबर 2025'आरक्षण बचाव' असा भव्य मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा विश्रामगृह जवळील विर बापूराव शेडमाके प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. बिरसा मुंडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले क्रांती चौक रावेरी पॉईंट मार्ग जोरदार घोषणांच्या गजरात तहसील कार्यालयावर धडकला. यामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. "आमचं आरक्षण आमचं हक्काचं", "बनावट आदिवासी हद्दपार करा", "आदिवासी आरक्षण आमचं अस्मितेचं प्रतीक आहे" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले ज्यात बंजारा समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट न करण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली असून आदिवासी आरक्षण कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवण्याची मागणी अधोरेखित करण्यात आली, तसेच बनावट जात प्रमाणपत्रांचा वापर करून ST कोट्यात शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली, मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती राळेगाव व यवतमाळ ने स्पष्ट इशारा दिला की, जर आदिवासी आरक्षणावर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि अधिक तीव्र आंदोलन उभारेल.
त्यावेळी आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ व सल्लागार समिती यवतमाळ राळेगाव तालुक्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();