टॉप बातम्या

चिखलगावमध्ये अतिक्रमणाचा वाढता विळखा; ग्रामस्थांचा स्थानिक प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील चिखलगाव गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

रस्ते, पायवाटा व गटारे अडवून झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक अडथळे, अपघातांचा धोका, सांडपाण्याची समस्या व दुर्गंधी यांचा त्रास होत आहे. ग्रामस्थांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी असून यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

निवेदन देतेवेळी रोहन वरारकर, वसंता डवरे, मनोज नवले, रोशन ढुमणे, द्रविड रांगणकर, चेतन खापणे, प्रमोद गौरकार अक्षय दडांजे, प्रशांत मोहुर्ले, क्रिष्णा अणे, साहिल कुडमेथे, भगवान वाभिटकर, आर्यन ढुमणे आदींची उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();