टॉप बातम्या

वणीतील आंदोलन प्रकरणात १२ कार्यकर्त्यांना यवतमाळ कारागृहात रवानगी, तालुक्यात खळबळ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी येथील आढावा बैठकी साठी आलेल्या आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या ताफ्याला अडवून विविध शेतकरी प्रश्नांसंदर्भात शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. या आंदोलनानंतर पोलिसांनी १२ शिवसैनिकांविरुद्ध कारवाई केली होती.

हे प्रकरण सोमवारी रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले. त्यानंतर आज, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता या सर्वांना यवतमाळ जिल्हा कारागृहात पाठवण्यात आलं. न्यायालयाने या १२ जणांच्या जामीन अर्ज फेटाळले आहे.

या अटकेत शिवसेने (उबाठा) चे जिल्हा प्रमुख व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();