टॉप बातम्या

यवतमाळ युवा सेना जिल्हा सचिव पदी प्रतीक गौरकार यांची निवड!


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिवसेना पक्षप्रमुख, व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा युवा सचिव पदी प्रतीक भाऊ गौरकार यांची निवड करण्यात आली. 

प्रतीकभाऊ यांची युवा नेतृत्वावर चांगल्या प्रकारे पकड असून ते वरिष्ठांच्या विश्वासावर खरे उतरणार असे युवा पिढी मध्ये बोलल्या जात आहे. गौरकार भाऊ यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये मजबूत पकड आहे. ते सनातन रक्ष दल मध्ये जिल्हा प्रभारी असून त्यांच्याशी कट्टर हिंदुत्ववादी युवा मुलांची टीम आहे. त्यांच्या पाठोपाठ शेकडो मुलांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचे बोलले जात आहे. 

यावेळी उपस्थित पराग पिंगळे विदर्भ समन्वयक, हरिहर भाऊ लिंगनवार शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजुदास भाऊ जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना, विशाल गणात्रा युवा सेना संपर्कप्रमुख, आकाश राठोड जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ गोरे यवतमाळ जिल्हा सह संपर्कप्रमुख विनोद भाऊ मोहितकर तसेच किशोर भाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली.

या निवडीने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();