सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : पडोली फाटा, यशवंत नगर, आमटा वार्ड तसेच परिसरातील माँ दुर्गा देवी व माँ शारदा देवी विसर्जन रॅलीतील मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ स्वामी विवेकानंद ज्ञान प्रसारक मंडळ, पडोली यांच्या वतीने पार पडला.
पडोली फाटा चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना शाल आणि शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, भक्तगण आणि कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद ज्ञान प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
