टॉप बातम्या

शांतता समिती सदस्य स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जिल्हा शांतता समितीचे सदस्य स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांना रविंद्रनाथ टागोर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ८ वाजता आयोजित या कार्यक्रमाला शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, व्यापारी मंडळ, पत्रकार बांधव व सोनार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान स्व. पाथ्रडकर यांच्या समाजकार्याची आणि शांतता समितीतून दिलेल्या योगदानाची उजळणी करण्यात आली. त्यांच्या अचानक निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृतींना सर्वांनी अभिवादन केले.

या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्व. राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी काम करण्याचा संकल्प केला. श्रद्धांजली कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();